संस्थेचे विशेष कार्य


• नेहरू युवा मंडळ फरकांडे हि रजिस्टर्ड सामाजिक संस्था असून संस्थेचे अप पर्यन्त व्यसनमुक्ती, पर्यावरण संतुलन, राष्ट्रीय एकात्मता महिला बालकल्याण, एच. आय . व्ही . एड्स , संदर्भात कार्य केले आहे व करीत आहे.

• व्यसन मुक्ती केंद्र : एरंडोल शहरात गेल्या ७ वर्षा पासून संस्थे मार्फत केंद्रीय योजने अंतर्गत संजीवन व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसण केंद्र सुरु असून केंद्रा मार्फत शेकडो रुग्ण व्यसन मुक्त होवून चांगले जीवन जगत आहेत. काही रुग्णांचे पुनर्वसन करून देवून त्यांना रोजगारही मिळवून दिला आहे.

• मोफत शिवण काम प्रशिक्षण केंद्र : एरंडोल शहरात गेल्या ५ वर्षा पासून केंद्रीय योजनेच्या माध्यमातून ओ . बी . सी . महिलांसाठी मोफत शिवण काम व विणकाम प्रशिक्षण केद्र सुरु करून महिलांना स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून दिली आहे .

• जलस्वराज्य प्रकल्प : महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत आमची संस्था सहायकारी संस्था म्हूणन कार्यरत असून संस्थेने प्रकल्पांतर्गत मोरफळ ता. पारोळा, जवखेडे खु. जवखेडे बु. हणमंतखेडे सीम , भातखेडे, पंप्रिसिम , ता. एरंडोल या ५ गावामध्ये काम सुरु आहे. प्रकल्पांतर्गत शुद्ध पाणी स्वच्छ परिसर यांचे हमत्व पटवून देवून गांवपुर्नपणे हगणदारी मुक्त करण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.

एड्स मार्गदर्शन केंद्र : डी . एफ . आ डी / एस . पी . वाय . एस . नवी दिल्ली यांच्या अंतर्गत शहरात गेल्या २ वर्षा पासून संस्थे मर्फेत एच . आय . व्ही . एड्स बाधीत रुग्ण व संभाव्य प्रतिबंधनासाठी रुग्णांना योग्य ते मार्ग दर्शन केले जात आहे.

• संस्थेला पुरस्कार व सन्मान : संस्थेचे सामाजिक कार्य पाहता नेहरू युवा मंडख या संस्थेला सन २००१ चा जिल्हा उत्कुष्ट मंडळाचा पुरस्कार तत्कालीन विधान सभेचे अध्यक्ष मा. श्री . अरुणभाई गजराथी यांच्या हस्ते मिळून गैरव करण्यात आला आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रातले योगदान पाहता संस्थेला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे .