नेहरू यूवा मंडळ संस्थेची माहिती


युवकांना दिशा मिळावी त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे.म्हणून समविचारी तरुण एकत्र येवून त्यांनी फरकांडे येथे १९९६ या वर्षी नेहरू युवा मंडळाची स्थापना केली. मंडळा मार्फत वर्षभर छोटे मोठे कार्यक्रम होत गेले त्यातून समाज प्रभोधन होवून युवकांच्या कलागुणांना वाव मिळाला.

संस्थे तर्फे थोर राष्ट्र पुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजरा होवू लागल्या. मंडळाच्या कार्य कर्त्यांना साक्षरता अभियान, पर्यावरण संतुलन, राष्ट्रीय एकात्मता, कुटुंब कल्याण, व्यसन मुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, आदी क्षेत्रात उत्कुष्ठ कामगिरी केली आहे.
मंडळाच्या कार्याची दखल घेवून जळगांव नेहरू युवा केंद्रा तर्फे मंडळाला जिल्हा उत्कृष्ट मंडळाचा पुरस्कार २००१ मध्ये विधानसभेत अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले आहे . संस्थेच्या पुक्रमांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देवून संस्थेच्या कार्याची दखल घेवून समाधान व्यक्त केले आहे .